आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण

share market

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । शेअर बाजारातील चढउतार ही नेहेमीचीच बाब असून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली. आज सेन्सेक्समध्ये १०७ अंकांची घसरण होऊन निर्देशांक ११, ८८३ पर्यंत खाली आला आहे.

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये यश बँक, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांच्या शेअर्सचे भाव वधारले होते. एमटीएनलच्या शेअर्सचे भाव ५ टक्क्यांनी वधारलेत. तर सन फार्मा कंपनीच्या शेअर्सच्या भावात घसरण कायम आहे. निफ्टीतही सन फार्मासोबत सिपला कंपनीचे शेअर्सचे दर घसरले. छोट्या आणि मध्यम दर्जाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांची वाढ दिसली. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धामुळे शेअर बाजारांमध्ये अजूनही अस्थिरता आहे. दुसरीकडे हॉंगकाँगमध्ये हिंसा उसळल्याने त्याचेही परिणाम आशियाई शेअर बाजारांवर दिसत आहेत.

Protected Content