यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साकळी प्राथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र असलेल्या थोरगव्हाण,पिळोदा खु. येथे गावांमध्ये यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजु तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी गावाचे प्राथमिक केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले, तालुका हिवताप पर्यक्षवेक्षक विजय नेमाडे, आरोग्य निरिक्षक अरुण चौधरी व नितीन वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यु दिवस साजरा करण्यात आला आणि मलेरिया व डेंग्यू कीटकजन्य आजारा विषयी माहिती देऊन जनतेला आरोग्य शिक्षण देवून जनजागृती करण्यात आली.
यावेळी आरोग्य सेवक मकरंद निकुंभ यांनी डेंग्यु आजारा बाबत उपस्थितांना सविस्तर माहिती सांगितली या कार्यक्रमाला पिळोदा खुर्दचे सरपंच सरला पाटील, पोलीस पाटील, अर्चना पाटील व ग्रामपंचायत संगणक संचालक दिगंबर पाटील यांचे देखील या जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमास सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला आशा स्वयंसेविका अनिता पाटील, अंगणवाडी सेविका बेबुबाई पाटील व ग्रामस्थ हजर होते..
साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वतीने डेंग्यु दिवसानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न
6 months ago
No Comments