जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। शहरातील पांडे चौकातील आर.एच. अग्रवाल हॉस्पिटलजवळ दोन दुचाकीच्या अपघातात जामनेर येथील वृध्द गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, ईश्वरलाल नारायण सुरळकर वय ६३ रा. चांगदेव नगर, जामनेर हे कामाच्या निमित्ताने ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पांडे डेअरी चौकातील आर.एच. अग्रवाल हॉस्पिटलजवळून दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीपी ५३४५) ने जात होते. त्यावेळी समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीपी ५३२४)ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ईश्वरलाल सुरळकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार घेतल्यानंतर त्यांनी मंगळवारी ९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दुचाकीधारकावर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.