वीजेच्या धक्क्याने वृध्देचा जागीच मृत्यू; वराडसीम येथील घटना

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील ५५ वर्षीय वयोवृध्द महिला गायीला पकडण्यासाठी गेल्या असतांना विद्यूत प्रवाह उतरलेल्या वीजेच्या खंब्याला धक्का लागल्याने गायीसह वृध्देचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ तालुकापोलीसात नोंद करण्याचे काम सुरू होते. 

कमल सुरेश पाटील (वय-५५)रा. वराडसीम ता. भुसावळ असे मयत झालेल्या वृध्दे महिलेचे नाव आहे. सविस्तर हकीकत अशी की, कमलबाई ह्या शेतमजूर असून मुलगा गजानन पाटील आणि सुन शितल यांच्यासोबत राहतात. शेती करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. आज बुधवारी २१ जुलै रोजी सकाळी ८ वाजता चरण्यासाठी मोकळी सोडलेल्या गायीला धरण्यासाठी गेल्या. त्यावेळी पाऊस झाल्याने संपुर्ण परिसर ओला होता. विद्यूत प्रवाह उतरलेल्या खंब्याजवळ गाय गेल्याने वीजेचा धक्का लागल्याने गाय जागीच ठार झाली. त्यानंतर कमलबाई ह्या देखील तेथे गेल्या त्यांना देखील विजेचा जोरदार धक्का बसला त्यादेखील जागीच ठार झाल्या. त्यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!