अरे बघतोस काय रागाने, खासदार फोडलाय वाघाने ! : सुषमा अंधारेंचा टोला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असतांना सुषमा अंधारे यांनी यावर अतिशय मिश्कील टिपण्णी करत भाजपला डिवचले आहे.

आज भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ होणार असल्याचे देखील संकेत मिळालेले आहेत. आज संपूर्ण राज्यात या पक्ष प्रवेशाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, शिवसेना-उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून अतिशय खोचक शब्दात याचा समाचार घेतला आहे. त्यांनी फक्त ”बघतोस काय रागाने. . .खासदार फोडलाय वाघाने !” असे नमूद करत भाजपला डिवचले आहे. या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पक्षाला खोचक टोला देखील मारला आहे.

Protected Content