Home Cities एरंडोल बापरे… वीजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जण ठार !

बापरे… वीजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जण ठार !


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील वरखेडे गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणाला विजेचा प्रवाह दिल्याने, त्याचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वरखेडे येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेताभोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता. या वीज प्रवाहाची कल्पना नसल्याने, मजुरीसाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना त्या तारेचा धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांकडून वन्यजीवांच्या त्रासापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनेकदा असे जीवघेणे उपाय योजले जातात. मात्र, यामुळे निष्पाप लोकांचा बळी जाण्याची शक्यता असते. या घटनेने शेतात लावलेल्या अशा धोकादायक विद्युत कुंपणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.


Protected Content

Play sound