स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री गुलाबराव पाटीलांची भेट

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी वर्गाने गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आपल्याला भेडसावत असलेल्या प्रश्नांना आपण एक राज्याचे तथा मुख्यमंत्र्यांचे अगदी जवळचे सहकारी मंत्री असल्याने आपण आमचे प्रश्न मार्गी लावावेत म्हणून त्यांच्या कडे साकडे घातले आणि नामदार भाऊंनी आपल्या मागण्या मी सर्वतोपरी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्या कडेस पाठपुरावा करेल असे आश्वासन पदाधिकारी यांना दिले.

त्यात प्रामुख्याने १)आम्हाला मिळणारे मार्जीन वाढवून मिळावे मनी २)शासकीय गोदामातून येणारे धान्य पूर्ण मोजून मिळावे तसेच मनुष्यास खाण्यासाठी योग्य असावे ३) ekyc साठी प्रती व्यक्ती ५० रुपये शुल्क मिळावे ४) मार्जीन मनी त्वरित दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत मिळावे ५) इष्टांक वाढवून मिळावा ६) गोदामातून धान्य हे ज्यूट बारदान मधूनच मिळावे अश्या अनेक मागण्याचे निवेदन देऊन आपण शासन दरबारी पाठपुरावा करावा असे निवेदन देण्यात आले.

प्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष जी.डी.पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, सोपान पाटील अमृत पाटील, दिलीप शिंदे, दिपक भदाणे, सुदर्शन पाटील, विशाल पाटील, संघटनेचे मार्गदर्शक राजूशेठ ओस्तवाल, अमोल पाटील उपस्थित होते.

Protected Content