पूरपरिस्थितीला अधिकाऱ्यांचे गैरव्यवस्थापन जबाबदार ; पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळांचा आरोप

Kolhapur Sangli flood 2

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोयना धरणासह कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा आणि राधानगरी या मोठ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन पूर्णपणे भरकटलेले होते. त्यामुळे पूरपरिस्थितीला आपल्याच राज्यातील मोठी धरणांवरील अधिकाऱ्यांचे गैरव्यवस्थापन जबाबदार असल्याचा ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी तसा थेट आरोप केला आहे.

 

SANDRP म्हणजेच South Asia Network on Dams, Rivers, and People दक्षिण आशियातील धरणे, नद्या आणि लोकजीवन यांविषयी अभ्यास करणाऱ्या अभ्यासगटाच्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात सांगली-कोल्हापूरच्या पुरासाठी राज्यातील धरणांच्या बेजबाबदार विसर्ग व्यवस्थापनावर बोट ठेवण्यात आले आहे. गाडगीळ यांनीही या अहवालातील निष्कर्षांवर शिक्कामोर्तब केले आहे. माधव गाडगीळ हे पश्चिम घाट पर्यावरण अभ्यास गटाचे प्रमुख आहेत. दरम्यान, वारणा, राधानगरी आणि कोयना या धरणांतून योग्य वेळी थोडा थोडा पाण्याचा विसर्ग केला असता, तर महापूर नक्कीच टाळता आला असता असेही गाडगीळ सांगतात. धरणावरचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे किंवा धरणातल्या पाणी विसर्गाचं नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सरकारला योग्य वेळी योग्य माहिती न दिल्यामुळे हा अनर्थ घडला असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Protected Content