जळगावात बालकविंना अभिवादन; रंगले कवि संमेलन !

balkavi abhivadan

जळगाव प्रतिनिधी । बालकवि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील काव्य रत्नावली चौकात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कवि संमेलनाचेही आयोजन करण्यात आले.

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित शहरातील काव्य रत्नावली चौकात अभिवादन करण्यात आले. आज सकाळी १० वाजता समाज चिंतामणी प्रतिष्ठान, जिल्हा साहित्य व सांस्कृतिक मंच, लेवा गणबोली साहित्य मंडळ, सरगम कला अकादमी आणि साहित्य प्रेमींतर्फे सदर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक प्राचार्य प्रभाकर श्रावण चौधरी, भगवान भटकर, कवी व कलावंत तुषार वाघुळदे, कवी व पोलिस उप अधीक्षक राजेंद्र रायसिंग, भास्करराव चव्हाण, डी. बी. महाजन , बालकवींच्या पणती विशाखाताई ठोंबरे-कुळकर्णी, स्नेहल कुलकर्णी, गायिका ज्योती राणे, वर्षा अहिरराव,
कवी गोविंद पाटील, विजय लुल्हे, सौ.कमल युवराज सोनवणे, युवराज सोनवणे, कवी एन. के .कोळी, पुष्पाताई कोळी, सौ. मीनाताई सैदाणे, आर. डी. कोळी, अशोक पारधे, प्रकाश पाटील, संतोष मराठे ,दिलीप सुरवाडे आदी साहित्य प्रेमी मंडळी उपस्थित होती.

प्रारंभी सर्व उपस्थित कवींनी बालकवींच्या स्मारकाजवळील शिलापटवर पुष्पांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित कवींनी असपल्या स्वरचित कविता , निसर्ग कविता सादर केल्यात. हे कविसंमेलन चांगलेच रंगले . कार्यक्रमाचा शेवट बालकवींची प्रसिद्ध औदुंबर कविता ऐल तटावर पैल तटावर , हिरवाळी घेऊन…निळा सावळा झरा वाहतो बेटा – बेटांतून ही सर्वानी सामूहिकरीत्या गायिली. यावेळी येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वेधले गेले होते. आभार आर .डी. कोळी यांनी मानले.

Protected Content