ऑक्टोबर महिन्यापासून संगांनियोच्या मानधनात वाढ

download 5

यावल (प्रतिनिधी)। महाराष्ट्र शासनाने येत्या ऑक्टोबर महीन्यापासुन संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहीना एक हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना,वृद्धपकाळ योजना अशा एकुण १३ हजार १७३ विविध योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील महीन्यापासुन प्रतिमाह एक हजार रुपयांचे मानधन मिळणार असुन,या लाभार्थ्यांमध्ये विधवा महीलांना एक हजार मानधन, महीलेस एक अपत्य असल्यास अकराशे रुपये, दोन अपत्य असल्यास 1200 रुपये मानधन मिळणार आहे. याकरीता ग्रामीण भागातील लाभार्थी महीलांनी स्थानिक पातळीवर आपल्या गावातील तलाठी यांच्याकडे आपलेआधार कार्डची झॅरोक्स प्रत, अपत्यांच्या जन्माची नोंद दाखले, बँकेच्या पासबुकची झॅरोक्स प्रत तात्काळ जमा करावी तर अपंग लाभार्थ्यांनी आपला अपंगत्वाचा दाखला सोबत आधारकार्ड, बँकेचे पासबुक तात्काळ ऑनलाईन करावे अशी माहीती तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी दिली.

यावल तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या विविध लाभार्थ्यांना दर महीन्यास८५ लाख रुपयांचे मानधन वितरीत करण्यात येते, आता शासनाने लाभार्थ्यांचे मानधन एक हजार रुपये केल्याने वितरीत होणारे मानधन हे आता एक कोटी रुपयापर्यंत जाणार असल्याची माहीती मिळाली आहे. शासनाने नव्या वाढवुन दिलेले एक हजार रुपयांचे मानधन हे पात्र लाभार्थ्यापर्यंत पहोचावे याकरीता तहसीलदार जितेन्द्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, संगांनियो विभागाचे अव्वल कारकुन रविंद्र मिस्त्री कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी हे प्रयत्नशील आहे. संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष विलास चौधरी आणी समितीचे सर्व संचालकांचे सहकार्य मिळत आहे.

Protected Content