यावल प्रतिनिधी । एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी यातून बरे होणार्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असल्याचे तालुक्यातील आकडेवारीतून दिसून आले आहे. यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
यावल व फैजपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. यातील सकारात्मक पैलू म्हणजे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. अलीकडच्या काळात आतापर्यंत यावल मधील मिळालेल्या ५५ बाधीत रुग्णापैक्की३९ रुग्णहे उपचार घेवुन घरपरतले असुन कोवीड सेन्टर ला एकुण १० रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत तर ६ जणांचा मृत्यु झाला आहे . फैजपुर शहरात मिळालेल्या एकुण७१ बाधीता पैक्की६३रूग्ण हे उपचाराअंती घर आले असुन यातील ६कोरोना बाधीतांचा मृत्यु झाला असुन सध्या २ रुग्ण कोवीड सेन्टरला उपचार घेत आहेत.
यातील लक्षणीय बाब म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील पेशंट बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. यात २७० कोरोना बाधीत रूग्ण मिळाले असुन यातील १८०च्या जवळपास रुग्णांना उपचरानंतर घरी सोडण्यात आले असुन सध्या ५५ रुग्णहे कोवीड सेन्टरमध्ये उपचार घेत आहे तर एकुण १८ जणांचा मृत्यु झाला आहे. आजवर ३००च्यावर रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असुन एकुण ६७ रुग्ण उपचार घेत असल्याने डिस्चार्ज होणार्या रुग्णांची संख्या बघता तालुक्यात कोरोना विरूध्दच्या लढाईला यश लाभतांना दिसून येत आहे. फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर, पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्यासह आरोग्य यंत्रणांच्या अथक परिश्रमातून हे शक्य झाले आहे.