मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रस्ते वाहतूक व महामार्गा मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमांत मोठे बदल केले आहे. वाहन चालकाला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लेखी परिक्षा द्यावी लागते. यासाठी बराच वेळ लागतो. पण आता खासगी संस्थांना चाचण्या घेण्यास व प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामुळे आरटीओ कार्यालयात जाऊन आता ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज पडणार नाही.
हा नवा नियम १ जूनपासून लागू होणार आहे. त्यानुसार, खासगी दुचाकी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान 1 एकर जमीन असावी. मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे 2 एकर जमीन असावी. यासोबतच वाहन चालकांच्या चाचणीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधाही उपलब्ध असणे गरजेच्या आहेत.