शेवटच्या वर्षाच्या परीक्षा होणार नाहीत- उदय सामंत यांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी । कोविड-१९ विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्‍वभूमिवर यंदा अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा होणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून दिली.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यात ते म्हणले की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर परिक्षा घेता येणार नसल्याची भूमिका आधीच राज्य सरकारने जाहीर केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या म्हणजेच बीए, बीकॉम, बी.एस्सी. आदी अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यात कुणाला परिक्षेला बसण्याची इच्छा असेल तर तो विद्यार्थी यासाठी परिक्षेला बसू शकतो. ही परीक्षा केव्हा घ्यावी याचा निर्णय हा विद्यापीठांनी घ्यावा असे सामंत यांनी सुचविले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षाचे पेपर बाकी आहेत त्यांची परीक्षा नेमकी केव्हा घ्यावी याचा निर्णय देखील विद्यापीठांनी घेण्याचे त्यांनी सूचीत केले. याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तर अभियांत्रीकी, व्यवस्थापन, फार्मसी, विधी आदींसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या परिक्षादेखील रद्द करण्याची मागणी उदय सामंत यांनी याप्रसंगी केली.

Protected Content