आता ग्राहकांना केवळ ५ हजार रुपयापर्यंतच वीज बिल ऑफलाइन भरता येणार

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । १ एक ऑगस्ट पासून महावितरणच्या विज बिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा ५ हजार रूपयांपर्यंत राहणार असून त्यामुळे सुरक्षित व सुविधा जनक असणाऱ्या ऑनलाईन पद्धतीने वीज देखाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरण च्या वतीने करण्यात आले आहे.

विज बिल भरण्याकरिता आजही शहरी व ग्रामीण भागात रांगेमध्ये उभे राहून वीज ग्राहक आपला बिलाचा भरणा करतात. त्याला आता ऑनलाइन भरण्याकरिता महावितरण पावले उचलत .लघुदाब कृषी वर्ग सोडून यांना दरमहा कमाल मर्यादा किंवा पाच हजार रुपया पर्यंतचे वीज बिल भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषी वर्गातील ग्राहकांना विज बिल रोखित भरण्यासाठी ची दरमहा कमाल मर्यादा १० हजार रुपये एवढी राहणार आहे.

ऑनलाइनला प्राधान्य
ऑनलाइनव्दारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पद्धतीस भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २०७७च्या तरतुदी असल्याने पाच हजारांपेक्षा अधिक रकमेचे वीजबिल रोखीने स्वीकारण्यात येऊ नये, अशा आशयाच्या सूचना सर्व वीज भरणा केंद्र, जिल्हा सहकारी बॅंकांना, सहकारी संस्था व पतपेढी यांना महावितरणकडून देण्यात येत असून, ग्राहकांनी देखील आपले वीजबिल ‘ऑनलाइन’ पद्धतीने भरण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
विनामर्यादा वीज देयकाचा भरणा करण्यासाठी ग्राहक ‘ऑनलाइन’ पध्दतीने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून तसेच महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही करू शकतो. ही पध्दत अत्यंत सुरक्षित असून, ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (जास्तीत जास्त ५०० रुपये) तर वीजबिलाचे प्रॉम्प्ट पेमेंट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येते. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यायांद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणारा वीजबिलाचा भरणा निःशुल्क आहे. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर वीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे.
ग्राहकांनी ऑनलाईन देयक भरल्यास त्याला सवलतही मिळते. त्यामुळे ग्राहकांनी महावितरणच्या संकेतस्थळ अथवा ॲपवरून ऑनलाईन भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यायांद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणारा वीजबिलाचा भरणा निःशुल्क आहे.
महावितरणच्या लघुदाब व कृषी वर्गवारीतील ग्राहक वगळता इतर वर्गवारीतील ग्राहकांना वीज देयक रोखीने भरण्याची कमाल मर्यादा राज्य वीज नियामक आयोगाने पाच हजार रुपये केली आहे. त्यामुळे हे ग्राहक आता पाच हजारांवरील देयक रोखीने भरू शकणार नाहीत. ही अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२३ पासून होईल.

ग्रामीण भागात ग्राहकांना करावी लागणार कसरत
आजही अनेक ग्रामीण भागामध्ये कनेक्टिव्हिटी चा अडचणी समोर येतात आणि त्यात महावितरण च्या वतीने काढण्यात आलेला फतवा काही प्रमाणात ग्रामीण भागामध्ये डोकेदुखी ठरू शकते.

Protected Content