तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील शास्त्री नगरात मध्यरात्री हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या दोन संशयितांना चाळीसगाव शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांकडून तलवार व दुचाकी हस्तगत केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील शास्त्री नगरात १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दोन संशयित हातात तलवार घेवून परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोकॉ गणेश कुवर, अमोल भोसले यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्‍याचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी मंजितसिंग दिलीपसिंग बावरी, वय 19 वर्षे रा. दिलीपसिंग बावरी, शैंदला, मेहकर बुलढाणा ह.मु बस स्टँण्डच्या पाठीमागे, चाळीसगाव आणि किरण सखाराम गवळी वय 22 वर्षे रा. लक्ष्मीनगर, संतोषीमाता मंदीरामागे, चाळीसगाव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी आणि तलवार हस्तगत केली आहे. दोघांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
जिल्हा पेालीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ योगेश बेलदार, पोना दिपक पाटील, पोकाँ निलेश पाटील, पोकाँ अमोल भोसले, पोकॉ नंदकिशोर महाजन, पोकाँ शरद पाटील यांनी कारवाई केली. यातील संशयित आरोपी मंजितसिंग बावरी यांच्या विरोधात यापुर्वी देखील गुन्हा दाखल आहेत.

Protected Content