शहीद पोलीस अधिकारी कामटे व हिमांशु राय यांना नोटीस

himashu ray

 

मुंबई प्रतिनिधी । राज्याच्या गृह विभागाने १४ पोलीस अधिकाऱ्यांना आपली मालमत्ता जाहीर करण्याच्या नोटीसा पाठविल्या आहेत. यात शहीद पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि आत्महत्या केलेले पोलीस अधिकारी हिमांशु राय यांचाही समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच या यादीत काही निवृत्त अधिकारी, तसेच काहींना पदावरून हटवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. गृह विभागाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात एकूण १४ आयपीएस अधिकाऱ्यांची यादी राज्य सरकारकडे पाठवली होती. यादीत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपले वार्षिक उत्पन्न जाहीर केलेले नाही, असे विभागाने राज्य सरकारला कळवले असल्याची माहिती समोर येत आहे.

Protected Content