मांडवे दिगर ग्रामस्थांना जमीन सोडण्याच्या नोटीसा : अडवला मोर्चा (व्हिडीओ)

mandave diger morcha

भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्यातील मांडवे दिगर येथील ग्रामस्थांना दोन हजार एकर जमीन रिक्त करण्याच्या प्रशासनाच्या नोटिसा नुकत्याच प्राप्त झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या असलेली जमीन अचानकपणे शासन जमा करण्याचे आदेश आल्याने येथील ग्रामस्थ हतबल झाले आहेत. या नोटिसा मिळाल्याचा धसका बसल्याने दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.

 

या घटनेचा विरोध करत राष्ट्रीय बंजारा टायगर, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, जय सेवालाल सेना व अन्य संघटनांतर्फे आज (दि.६) ‘जमीन बचाव जनआंदोलन मोर्चा’ मुसळतांडा फाट्यावरून भुसावळ प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता.
हा मोर्चा भुसावळमध्ये दाखल होताच तालुका पोलिसांनी हा मोर्चा तालुका पोलीस स्टेशनजवळ थांबवून मोर्चाची परवानगी नाकारली. मुसळतांडा फाट्याजवळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभार व त्यांच्या पोलिस सहकार्यांनी हा मोर्चा अडवला. त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी नोटिसांबद्दल शासनाविरुद्ध संतप्त भावना व्यक्त केल्या.

 

 

Protected Content