जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभेप्रमाणे विधानसभेतही सत्ताधाऱ्यांना दणका बसला असून आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्र्यांसह जळगाव जिल्ह्यातील एकही गद्दार आमदार निवडून येणार नाही ! असा दावा करत खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिकास्त्र सोडले.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
शिवसेना-उबाठा पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे जिल्हा दौऱ्यावर असून आज सकाळी जळगावात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टिका केली. यात प्रामुख्याने त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचही गद्दार आमदार या निवडणुकीत निवडून येणार नसल्याचा दावा केला. तर त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सरकारला धारेवर धरले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, राज्यातील पोलीस खात्ो हे बरबटलेले असून त्यांचा उपयोग हा फक्त विरोधकांचा काटा काढण्यासाठी होत आहे. बदलापूरमधील पीडित बालिकांचे पालक हे 12 दिवस फिरत असतांना देखील गुन्हा दाखल होत नव्हता. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली असून याला सर्वस्वी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असल्याचे आरोप त्यांनी केले. राज्यातील जनता आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवून घरी बसवणार असल्याचा दावा देखील त्यांनी याप्रसंगी केला.