केंद्राला एक नवा पैसाही पाठवला नाही : देवेंद्र फडणवीस

mumbai cm devendra fadanvis bjp

 

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्राला एक नवा पैसाही परत पाठवलेला नाही, केंद्राकडून पैसा आलाच नाही, शिवाय काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही”, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या ४०,००० कोटी रुपयांच्या निधीचा महाविकास आघाडीच्या सरकारकडून गैरवापर होऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला होता.

 

फडणवीसांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत केलेल्या गौप्यस्फोटाबाबत स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनंत कुमार हेगडे यांचा दावा फेटाळून लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक चाल होती. फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा दावा भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Protected Content