मराठा आरक्षणास स्थगिती नाही

Supreme Court of India

नवी दिल्ली वृत्तसंस्था । मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मराठा आरक्षणाविरोधातील दोन याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्य पीठापुढे याबाबत सुनावणी पार पडली. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारला नोटीस पाठवली असून उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. राज्य सरकारने दोन आठवड्यांनंतर आपलं उत्तर दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे.

Protected Content