पिंपळगाव हरेश्‍वरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी ( व्हिडीओ )

विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलतर्फे मोफत आरोग्यसेवा

पाचोरा प्रतिनिधी । प्रति पंढरपूर म्हणून गणल्या जाणार्‍या तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथील विठ्ठल मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी दाखल झाली असून येथे विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलतर्फे मोफत आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली आहे.

pimpalgaon hareshvar mandir

आषाढी एकादशीला पंढरपुर येथे जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेणे प्रत्येक भाविकांसाठी शक्य होत नाही. आपल्या लाडक्या विठु रायाचा पदस्पर्श व्हावा यासाठी पंढपुरची अनुभूती घेण्यासाठी आज पहाटेपासूनच पिपळगाव हरेश्‍वर विठ्ठल मंदिरात हजारो भाविक दाखल झाले आहेत. पहाटे विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. भूषण मगर आणि डॉ. सौ. पिती मगर व जि.प. सदस्य संजय गरूड यांच्या उपस्थितीत विठ्ठलाची आरती करण्यात आली.

याप्रसंगी अनिल वाघ, वीर मराठा मावळा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश शिंदे, स्वराज ग्रुपचे लकी पाटील यांच्यासह तालुक्यातील ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शनासाठी महिला व पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून परिसराला जत्रेचे स्वरूप मिळालेले आहे. या अनुषंगाने भाविकांसाठी पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे डॉ. भूषण मगर व डॉ. सागर गरुड यांनी मोफत आरोग्य तपासणी व उपचार सेवा पुरवली आहे. इमर्जन्सी अँबुल्सची व्यवस्था ही करण्यात आली आहे. तसेच पाणी व फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहा : पिंपळगाव हरेश्‍वरच्या मंदिराबाबतचा हा व्हिडीओ वृत्तांत.

Protected Content