जळगाव प्रतिनिधी । राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये असे सांगतांनाच राजकारणात कुणी कायम मित्र वा शत्रू नसतो असे सूचक वक्तव्य पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज केले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नेमक्या याच मुद्यावर आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना बोलते केले असता त्यांनी सावध पवित्रा घेतला. ते म्हणाले की, दोन नेते हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन वैयक्तीक कारणासाठी देखील भेटू शकतात. यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढणे गैर आहे. शिवसेना व भाजप हे हिंदुत्ववादी असल्याने आता एकमेकांकडे ओढा वाढत आहेत का ? अशी विचारणा केली असता त्यांनी मिश्कीलपणे हा ओढा निर्माण करण्याचे काम माझे नसल्याचे स्पष्ट केले. तथापि, राजकारणात कुणी कायम मित्र वा शत्रू नसतो हे सांगण्यास ते विसरले नाहीत.
खालील व्हिडीओत पहा ना. गुलाबराव पाटील नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1269539426718976