ब्रेकींग : गिरीश महाजनांच्या वाहनाने एकाला उडविले; मागून धडक दिल्याचे आ. महाजन यांचे स्पष्टीकरण

शेअर करा !

पाचोरा नंदू शेलकर । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या कारने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्‍याच्या दुचाकीला धडक दिली असून यात तो कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर, संबंधीत दुचाकीस्वाराने मागून धडक दिल्याची माहिती आ. गिरीश महाजन यांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील लोहारी- वरखेडे गावाच्या दरम्यान माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या कारने एका दुचाकीस्वाराला उडविले. यात अपघातात वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बी.सी. पवार हे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आली नसून जखमीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली. आ. गिरीश महाजन यांनी आपल्या गाडीतूनच जखमी कर्मचार्‍याला पाचोरा येथील खासगी रूग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

मागून दुचाकी आदळली- आ. महाजन

दरम्यान, आपल्या वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले नसून तो मागून आपल्या कारवर आदळला असल्याची प्रतिक्रिया आ. गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे. मागू दुचाकी आदळल्यामुळे आपल्या गाडीच्या मागील भागाचे नुकसान झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तर आपण स्वत: जखमीला रूग्णालयात पोहचवल्याचेही ते म्हणाले.

accident 1

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!