जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्राध्यापकांच्या विविध प्रलंबीत मागण्या मान्य व्हाव्यात. यासाठी एन.मुक्टो संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने विद्यापीठाचे प्र-कुलगुरु एस. टी. इंगळे व रजिस्ट्रार डॉ.किशोर पवार यांना मागण्यांचे आज निवेदन देण्यात आले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २००५ नंतर लागलेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, यूजीसी रेग्युलेशनप्रमाणे ७ व्या वेतन आयोगाची समग्र अंमलबजावणी व्हावी. यासह प्राध्यापकांच्या अन्य प्रलंबीत मागण्या मान्य व्हाव्यात. यासाठी एन.मुक्टो संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने विद्यापीठाचे प्र-कुलगुरु एस. टी. इंगळे, रजिस्ट्रार डॉ.किशोर पवार यांना आज बुधवार, दि. १७ ऑगस्ट रोजी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन मा.कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली शासनास कळविण्यात येईल. असे आश्वासन त्यांनी दिले. सदर आंदोलनात एनमुक्टो केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल पाटील, एमफुक्टोचे सहसचिव प्राचार्य डॉ. संजय सोनवणे, प्रा. सुधीर पाटील, एनमुक्टो केंद्रीय कार्यकारिणी पदादिकारी प्रा. डॉ. महेंद्रसिंग परदेशी, प्रा. डॉ.मोहन पावरा, प्रा नितीन बाविस्कर, प्रा. डॉ. गौतम कुवर, प्रा. डॉ. बी. टी. पाटील, प्रा. एकनाथ नेहते, प्रा. डॉ. किशोर वाघ, प्रा. डॉ. प्रकाश लोहार, प्रा. डॉ. सुरेखा पालवे, प्रा.डॉ. सुनिता कावडे, प्रा. डॉ जितेंद्र तलवारे, प्रा डॉ. मुकेश चौधरी, प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे. प्रा.डॉ.वासुदेव वले, प्रा. डॉ. ए .जी. सोनवणे, प्रा.डॉ. ताराचंद सावसाकडे, प्रा. डॉ महेश गांगुर्डे, प्रा. डॉ . प्रभाकर महाले, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रा. दिनेश पाटील, धुळे जिल्हा सचिव प्रा. डॉ. संजय खैरनार, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष प्रा. अधिकार बोरसे, नंदुरबार जिल्हा सचिव प्रा.एस. एस. पाटील आणि विद्यापीठ परिक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील हजारो स्थानिक शाखेचे पदाधिकारी व प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलनातील प्रमुख मागण्या –
1) देशभर 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
2) 18 जुलै 2018 च्या यूजीसी च्या रेग्युलेशनची मोडतोड न करता समग्र योजना जशीच्या तशी लागू करा.
3) यूजीसी धोरणानुसार देशातील सर्व कार्यरत व सेवानिवृत्त प्राध्यापकांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन आणि पेन्शन प्रणाली लागू करण्यात आवी.
4) कॅस अंतर्गत सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांची पदोन्नती देय दिनांकापासून लागू करण्यात यावी.
5) वर्षातून किमान दोनदा कॅस कॅम्पचे आयोजन करण्यात यावे तसेच कॅस अंतर्गत पदोन्नती करता विद्यापीठाच्या स्थान निश्चिती शिबिरासोबत सहसंचालकाचे वेतन निश्चितीचे शिबीर आयोजित करावे.
6) एमफील व पीएचडी च्या वेतन वाढी पूर्ववत सुरु करण्यात यावे.
7) यूजीसी धोरणानुसार विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापकांची रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावीत.
8) परिक्षेच्या कामकाजात सिनियर सुपरवायझर भरारी पथकावर सेवाज्येष्ठतानुसार प्राध्यापकांची नियुक्ती करा.
9) सर्व स्तरांवर शिक्षण संस्थेत विद्यार्थी – शिक्षक आवश्यक गुणोत्तर राखणे.
यासंदर्भात केंद्रीय एनमुक्टोचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी पत्रकाद्वारे माहिती कळविली आहे.