रावेर प्रतिनिधी | तरूणीला विवाहाचे आमीष दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले खानापूर येथील सेंट्रल बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक नितीन शेंडे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील एका २३ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पीडित तरुणीने येथील पोलिसात १५ ऑगष्टला खानापूर येथील सेंट्रल बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन शेंडे यांच्यासह चार जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी नितीन शेंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. या अनुषंगाने खंडपीठात सुनावणी होऊन दिनांक २९ सप्टेबर रोजी शेंडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. शेंडे यांच्यातर्फे ऍड. सागर चित्रे व व्ही. बी. पाटील यांनी काम पाहिले.