भुसावळात पिस्तुल बाळगणार्‍या आरोपीस अटक; एलसीबी पथकाची कारवाई

भुसावळ प्रतिनिधी। शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ रहिवाशी तुषार सतीश जाधव व त्याच्या सोबत एक अल्पवयीन युवकाला एलसीबीच्या पथकाने गावठी पिस्तुलासह अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी स्था.गु.शा.जळगांव पोहेकॉ रविंद्र भागवत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनीच्छा वाडी भागातील रहिवाशी तुषार सतीश जाधव वय २० तसेच सोबत एक अल्पवयीन तरुण असे दोघांना जळगाव रोडवरील तीन नंबर पेट्रोल पंपाजवळील पंचमुखी हनुमान मंदीराजवळ गैर कायदा, विना परवाना १५ हजार रुपयांचे एक गावठी बनावट पिस्तुल व प्लॅस्टिक मूठ लावलेली रिकामी मॅगझीनसह कब्यात बाळगत असतांना आज दिनांक १ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास आढळून आले.

या अनुषंगाने संशयित आरोपीच्या विरुद्ध भाग- ६ आर्म अँक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच आरोपीच्या ताब्यातून एक हिरो डिलक्स मोटर सायकल एम.पी.६८ एम.डी ९८०२ क्रमांकाची १५ हजार रुपये किंमतीची अशी एकूण तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल सह शहर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे. ही कारवाई स्थनिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली केली. संबंधीत आरोपीला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय स्वप्नील नाईक,पो हे कॉ. रविंद्र पाटील,कमलाकर बागुल, पो.ना दादाभाऊ पाटील पो.काँ अशोक पाटील अशांनी मिळून केली.

Protected Content