‘नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही’ – निलेश राणे

Nilesh Rane Nitesh Rane

 

मुंबई प्रतिनिधी । मिडियाने माझ्या ट्वीटचा गैर अर्थ काढला, नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. पण ज्या दिवशी शिवसेना राणेसाहेबांची बदनामी थांबवेल, तेव्हा माझा आणि शिवसेनेचा विषय संपेल, अशी भूमिका माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी बंधू नितेश राणे यांनी दाखवली असतानाच निलेश राणे यांनी ट्विटरवरुन असहमती दर्शवली.

कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीतेश राणे यांनी शिवसेनेशी सलगी करण्याचे संकेत दिल्यामुळे त्यांचे थोरले बंधू नीलेश राणे भलतेच नाराज झाले होते. जाहीर ट्विट करून त्यांनी नीतेश यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता. त्यामुळे दोन्ही भावांतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. तशा बातम्याही सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. निवडणुकीचा प्रचार करताना शिवसेनेवर टीका करणार नाही. मी निवडणूक मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी लढवतोय. आम्ही मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय आणि तो तंतोतंत पाळला आहे. माझ्यासमोर शिवसेनेचा उमेदवार असला तरी कुठलाही संघर्ष होणार नाही. गरज भासल्यास विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन, असं नीलेश यांनी म्हटलं होतं. त्यावर नाराजी व्यक्त करणारं ट्विट नीलेश यांनी केलं होतं.

Protected Content