हिंदू मुलींना फसवून धर्मपरिवर्तन केलं जातय – नितेश राणे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज विधानसभेच आमदार नितेश राणे यांनी हिंदू मुलींच्या धर्म परिवर्तनाचा मुद्दा उपस्थित करत यावरून कायदा करण्याची मागणी केली.

भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सभागृहात लक्षवेधीमध्ये धर्म परिवर्तनाचा मुद्दा मांडला. यावेळी श्रीरामपुरातील धर्मांतरावरून नितेश राणे यांनी विधानसभेत धर्म परिवर्तनाचे रेट कार्ड सादर केले. हिंदु मुलींना फसवून धर्मपरिवर्तन केले जाते. त्यामुळे धर्मांतर कायदा लागू करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली.

श्रीरामपुरात एका अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने २०१९ मध्ये १३ वर्षाची असताना पीडितेला बळजबरीने शाळेतून उचलून नेले आणि तिचे धर्मांतर केले. त्यानंतर तिच्याशी निकाह करुन तीन वर्षापासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख मनोज पाटील यांनी सानप यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. हाच मुद्दा आज आमदार नितेश राणे यांनी सभागृहात उपस्थित केला.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंदू मुलींना फसवून धर्मपरिवर्तन केले जाते, असे म्हणत नितेश राणे यांनी सभागृहात रेटकार्ड वाचून दाखवले. नितेश राणेंच्या लक्षवेधीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. धर्मांतर विरोधी कायदा अधिक कडक करू, असे ते म्हणाले.

Protected Content