निर्मल सीडसच्या दोन नवीन जैविक उत्पादनांचे अनावरण

nirmal seeds pachora

जळगाव/पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील निर्मल सीडस या विख्यात कंपनीने आता रायझामिका आणि स्नायपर या दोन जैविक उत्पादनांना सादर केले असून येथील कार्यक्रमात याचे अनावरण करण्यात आले.

निर्मल सिडसतर्फे जिल्हयातील वितरक व विक्रेता स्नेह संमेलन सोहळ्यात ते बोलत होते. स्नेहसंमेलन सोहळा जळगाव येथील हॉटेल कमल पॅराडाईजमध्ये नुकताच संपन्न झाला. या शानदार सोहळ्यात निर्मल सिडस्ने विकसीत करुन बाजारात आणलेले नवे उत्पादन रायझामिका आणि स्नायपर या दोन जैविक उत्पादनांचे अनावरण निर्मल सिडसचे संचालक डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या शानदार सोहळ्यास निर्मल सिडस्चे संचालक डी.आर.देशमुख, भडगाव येथील गजेंद्र कृषी सेवा केंद्राचे संचालक मेहतापसिंग नाईक, कृषी विकास अधिकारी मधुकरराव चौधरी, जळगाव आदर्श ग्रोचे संचालक राजेंद्र धनसिंग पाटील, धरणगाव कैलास ग्रोचे संचालक कैलास मालु, खंडेलवाल ग्रो कृषी सेवा केंद्राचे संचालक अनिल खंडेलवाल त्याचबरोबर निर्मल सिडस्चे उपमहाव्यवस्थापक जी.एम.पाटील, पी.ए.दळवी, वसंत वायाळ इत्यादी उपस्थित होते.

नविन प्रॉडक्टच्या लाँचिंग नंतर पी.ए.दळवी यांनी नविन उत्पादनांची माहिती देतांना सांगितले की ही दोन्ही उत्पादने नव्या युगाची जैविक उत्पादने आहेत. रायझामिका हे रुट ऑरगन कल्चर या अभिनव पध्दतीने ग्लोमस नावाच्या तीन प्रजातींपासून तयार केलेले हे मायकोरायझल जैविक खत आहे. यामुळे रासायनिक खतांच्या मात्रेत २०-२५% बचत होते. हे तंत्रज्ञान पेंटेंडेड असून शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी वरदान ठरले आहे. तर स्नायपर हे अनेक पिकांसाठी रासायनिक किटकनाशकाला जैविक पर्याय म्हणुन प्रभावशाली असून वाळवी, हुमणी व लष्करी अळीच्या सक्षम नियंत्रणासाठी प्रभावी आहे अशी माहिती त्यांनी दिली.

तर डॉ. सुरेश पाटील म्हणाले की, देशी कापूस वाणामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे. किड व रोग प्रतिकार शक्ती आहे. कमी पाण्यात, कमी खर्चात भरघोस उत्पादन देण्याची क्षमता आहे. म्हणुनच सध्याच्या काळात जमिनीचा बिघडलेला पोत, पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास आणि उत्पादनात होणारी मोठी घट हे नुकसान टाळण्यासाठी कमी पाण्यात व कमी खर्चात येणारे पिक म्हणजे देशी कापुस. पाण्याचे महत्व लक्षात घेता देशी कापसाची लागवड करणे शेतकर्‍यांच्या फार हिताचे आहे. डी. आर.देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, शेतीच्या विकासासाठी व शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी आम्ही क्लास दहा हजार या उच्च कोटीच्या अत्याधुनिक गुणवत्तेच्या वर्गात मोडणारी प्रशस्त प्रयोगशाळा उभारुन एक अव्दितीय जैविक तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे.
कृषी विकास अधिकारी मधुकरराव चौधरी म्हणाले की, निर्मलचे देशी कपाशी वाण उत्कृष्ट आहेत. काळाची गरज म्हणुन शेतकर्‍यांनी देशी कापसाची लागवड करायला हवी. तसेच जैविक उत्पादन निर्मिती क्षेत्रातही निर्मलने क्रांती केली आहे. त्याचबरोबर वितरक व विक्रेत्यांना खरीफ हंगामसाठी त्यांनी यथोचित व सविस्तरपणे मार्गर्शन केले.

याप्रसंगी नोवेल सिडस् चे संचालक डॉ. जितेंद्र सोलंकी, संकेत पाटील व तुषार देशमुख, निर्मल सिडस्चे झोनल मॅनेजर आर. आर.बागुल, प्रदिप पाटील, नाना पाटील, भटुसिंग महाले, चंद्रकांत वाघ, विजय कच्छवा, सुभाष पाटील, भुषण गावंडे, जगदिश पाटील इत्यादीसह जिल्हयातील निर्मल सिडस्चे वितरक व विक्रेता ५०० हून अधिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन वसंत वायाळ यांनी केले तर सुत्रसंचालन रवि चौरपगार यांनी केले.

Add Comment

Protected Content