निंभोरासिम येथे दरड कोसळून दोन तरुण ठार : एक जखमी

nimbhora news

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील निंभोरासिम येथे दरड कोसळुन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि.७) घडली असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना सकाळी १०.३० सुमारास घडली. या घटनेमुळे निंभोरासिम, नायगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

 

निंभोरासीम येथील प्रत्यक्षदर्शी’च्या माहितीनुसार गळ काढण्यासाठी निंभोरासिम-विटवा दरम्यान रस्त्या वरील गट नंबर ४६ वरील शासकीय बरड येथे दीपक सवर्णे (वय २०) निंभोरासिम तर सुशांत मराठे (वय २२) समाधान कोळी (वय २०) दोघे राहणार नायगाव (ता. मुक्ताई नगर) गोपीचंद सपकाळे (रा.सुनोदा) हे आपल्या साथिदारासह एका वाळू ठेकेदारासाठी गळ काढण्याच्या कामासाठी निभोरासिम येथे आले होते. काम करत असतांना अचानक गळ काढत असतांना वरुन दरड खाली कोसळली यामध्ये दीपक सवर्णे, सुशांत मराठे हे जागीच ठार झाले तर समाधान कोळी जखमी झाला आहे. गोपीचंद सपकाळे यांना वेळेत कळल्याने सुखरूप बचावले आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मयतांचे शवच्छदन करण्यात आले. यावेळी नातलग व गावक-यांची एकच गर्दी केली होती. जि.प. अध्यक्षा सौ. रंजना पाटील, प्रल्हाद पाटील, राजू सवर्णे, गणेश चौधरी यांनी भेट देवून नातलगांचे सांत्वन केले.

अवैध वाळू वाहतुकीचे केंद्र
निंभोरासिम (ता रावेर) या गावाजवळुन तापी नदी वाहते येथील गावानजीक नदीपात्र मोठे असल्याने मोठा गौण खनिजसाठा येथे आहे. दरोरोज दिवसा-ढवळ्या येथून अवैध वाळू, खडीचे मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. आस-पासच्या गावाच्या युवकांना वाळू माफियावाले पैशांची लालूच दाखवून गरीब शाळकरी मुलांना टॉली मध्ये गौणखनिज भरण्यासाठी नेतात. त्यातून यापूर्वीही अशा घटना तालुक्यात घडल्या आहेत. यावर अंकुश ठेवण्यात महसूल विभाग सपशेल अपयशी ठरला आहे.

Protected Content