मुंबई प्रतिनिधी । नालासोपाऱ्यातील नायजेरियन तरुणाच्या महापालिकेच्या रुग्णालात अकस्मात मृत्यू झाल्याने संतापलेल्या काही नायजेरियन जमावाकडून तब्बल 27 वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना नालासोपारा पुर्व प्रगती नगर परिसरात आज (दि.17) रोजी सकाळी 3:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जोसेफ या नायजेरियन तरुणाचा मंगळवारी (दि.16 ऑक्टोबर) रोजी रात्री महापालिकेच्या रुग्णालात अकस्मात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. मात्र, जोसेफच्या मृत्यूची बातमी कळताच संतप्त झालेल्या काही नायजेरिअन नागरिकांनी नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली. नायजेरियन तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टॅक्सी, टँकर, दुचाकी या वाहनांवर मोठमोठे दगड फेकत दांड्यांनी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यामध्ये तब्बल 27 वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच, काही नागरिकांनाही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत, तर नायजेरियन जोसेफच्या अकस्मात मृत्यूचीही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.