हा भारतीय संविधानाचा सगळ्यांत मोठा अपमान ; संजय राऊत

 

मुंबई, वृत्तसंस्था । तरुणांना श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावू न देणे हा भारताच्या संविधानाचा सगळ्यांत मोठा अपमान केला आहे, असं शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतरही श्रीनगरमध्ये काही तरुणांना तिरंगा फडकावण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे त्याच पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत यांनी टीका केली आहे.

चार दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय जनता पार्टीचे चार कार्यकर्ते तिथे तिरंगा फडकवायला गेले होते. त्यांना पोलिसांनी तिकडून पकडून पुन्हा पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यांना तिरंगा फडकावण्यापासून रोखण्यात आलं. ३७० कलम आता हटवण्यात आलं आहे. तरीसुद्धा आम्ही आमच्या लोकांना तिकडे तिरंगा फडकावण्यापासून रोखत असू, तर काश्मीरमध्ये काय बदल झाला आहे हा लोकांच्या मनात प्रश्न आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

मेहबुबा मुफ्तीच कशाला फारुख अब्दुल्लाही बोलले होते, कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी आम्ही चीनची मदत घेऊ,याबाबत केंद्रानं कठोर पावलं उचलायला हवीत. मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला हे दोन्ही काश्मीरमधले नेते ज्या पद्धतीनं तिरंग्याबाबत बोलतात हा तिरंग्याचा अपमान आहे. हा देशाच्या घटनेचा अपमान आहे. हा घटनेच्या स्वातंत्र्याचा अपमान असल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू होत नाही, तोपर्यंत तिरंगा फडकावणार नाही, असं सांगणं हा १३० कोटी जनतेचा अपमान आहे.

Protected Content