
चेन्नई (वृत्तसंस्था) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरूवारी तामिळनाडूतील कोईंबतूर शहरात पाच ठिकाणी छापे टाकत संशयित साहित्य जप्त.
काही दिवसांपूर्वी एनआयएने कोईंबतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये इसिसशी प्रभावित असलेल्या एकाला अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला मोहम्मद अझरूद्दीन हा श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी बॉम्बस्फोट करणाऱ्या झहरान हाशिमशी प्रभावित झाला होता. त्यानंतर एनआयने याप्रकरणी एक नवी तक्रार दाखल केली होती. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीदेखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी केलेल्या छापेमारीतून लॅपटॉप, मोबाइल फोन, सिम कार्ड आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, कोणत्या कारणासाठी एनआयएने छापे टाकले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.