के.के.उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यू कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

WhatsApp Image 2019 08 30 at 10.58.21 AM

जळगाव, प्रतिनिधी | येथील के.के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यू कॉलेज मध्ये आज २९ ऑगस्ट रोजी हाकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्यात आला.

या वेळी मुख्यअधयापिका शमीम बानो मलीक यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्व सांगून मेजर ध्यानचंद चे क्रिडा क्षेत्रातील योगदान व स्थान सांगितले. अकिल खान यांनी स्वास्थ्य संबंधीची प्रतिज्ञा दिली. यावेळी विध्यर्थीनीना पंतप्रधान नरेंद्र मोदी यानंचे ‘फीट इंडिया मोमेनट वर आधारित भाषणाचे थेट प्रेक्षपण प्रोजेक्टरद्वारे दाखविण्यात आले. इम्रानखान पठाण, तसेच क्रीडा विभागाच्या समीना शेख, कययुम शेख यांनी मादर्शन केले. शाह जाकिर, मझहरोदीन शेख, मुश्ताक भिसती, यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

Protected Content