न्युझीलंड संघाचा मार्टिन-जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराने सन्मान

New Zealand team

 

मुंबई वृत्तसंस्था । इंग्लंडने क्रिकेट वर्ल्डकप २०१९च्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त अंतिम सामन्यात हे विजेतेपद जिंकले. इंग्लंडमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव झाला. या वादग्रस्त सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतरही न्यूझीलंडच्या संघाने चमकदार खेळी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले असून संघाला ख्रिस्टोफर मार्टिन-जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वर्ल्डकप 2019 च्या अंतिम सामन्याच्या निकालावरून आयसीसीवर जोरदार टीका करण्यात आली. ‘त्या’ नियमामुळे एका संघावर अन्याय होत आहे, अशी भावना व्यक्त होत होती. पण न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी मात्र तो निर्णय खिलाडूवृत्तीने स्वीकारला. त्यामुळे न्यूझीलंडला यंदाचा मार्टीन-जेन्कीन्स स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार देण्यात आला. विजेत्याची निवड करण्यासाठी तयार केलेल्या समितीने न्यूझीलंडच्या खिलाडूवृत्तीमुळे त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. २०१३ सालापासून एमसीसीतर्फे हा पुसस्कार दिला जातो.

Protected Content