जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मनियार बिरादरी ने २०२२ या नववर्षाच्या सुरुवातीला संकल्प केला आहे की, या वर्षात समाजातील घटस्फोटीत, व परित्यक्ता महिलांना महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध देण्याचा संकल्प केला आहे.
या संकल्पाची सुरुवात म्हणून एक जानेवारीला गरजू महिलांना पाच शिलाई मशीन देऊन करण्यात आली. गृह उद्योग चालवायचा आहे अशा महिलांनासुद्धा मन्यार बिरादरी आर्थिक सहकार्य करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांनी सांगितले.
मागील दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने शाळेबाहेर बसून गोळ्या बिस्किटे विकणारी महिला यांनासुद्धा मन्यार बिरादरी आवश्यकतेनुसार आर्थिक पाठबळ देत असून घटस्फोटित ,विधवा व पीडित महिला ज्यांना स्वयंरोजगारासाठी मदतीची आवश्यकता असेल त्यांनी जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीच्या रथ चौक येथील कार्यालयात संपर्क साधावा व त्या ठिकाणी सहाय्य मिळण्यासाठी अर्ज भरून द्यावे असे आवाहन बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी केले आहे
५ शिलाई मशीन देऊन केली सुरवात
एक जानेवारी रोजी पिंप्राळा हुडको, रजा कॉलोनी,मेहरून, मास्टर कॉलोनी मेहरून, उस्मानिया पार्क व सीड फार्म मुक्ताईनगर येथील महिलांना शहराध्यक्ष सैयद चाँद, संचालक हारून महेबूब, अब्दुल रउफ रहिम व अध्यक्ष फारुक शेख यांच्या हस्ते बिरादरीच्या कार्यालयात ५ शिलाई मशीन देण्यात आल्या.