पालकमंत्र्यांच्या हस्ते व्यायामशाळा व आधुनिक उपकरणांचे लोकार्पण !

धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील युवकांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अद्ययावत व्यायामशाळा उभारून यात आधुनिक जीमचे साहित्य प्रदान करण्याचे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता करत आज पालकमंत्र्यांच्या हस्ते व्यायामशाळा आणि यातील साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.

‘कोरोनाने आपल्याला व्यायामाचे महत्व पटवून दिले आहे. यासोबत पोलीस, सैन्यदल, निमलष्करी दल आदींसारख्या ठिकाणी भरतीसाठी देखील व्यायाम आवश्यक आहे. तर एकंदरीत पाहता निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी व्यायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन’ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या हस्ते तालुक्यातील निंभोरा येथील जय भोले मंदिराजवळ असणार्‍या व्यायामशाळेसह यातील आधुनिक जीम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना पालकमंत्री बोलत होते. यावेळी या व्यायामशाळेचा परिसरातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती प्रेमराज पाटील हे होते.

धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील युवकांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अद्ययावत व्यायामशाळा उभारून यात आधुनिक जीमचे साहित्य प्रदान करण्याचे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता करण्यात आली असून आज पालकमंत्र्यांच्या हस्ते ही व्यायामशाळा आणि यातील साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, युवासेनेचे तालुका प्रमुख चेतन पाटील, उपतालुका प्रमुख पवन पाटील, दामूअण्णा पाटील, परिसरातील सरपंच अशोक पाटील, धीरज पाटील, कैलास पाटील, शाखा प्रमुख नवल पाटील, भागवत पाटील , मुख्याध्यापक प्रमोद पाटील , आदर्श शिक्षक बाळू पाटील , कैलास सोनवणे आदींसह व्यायामप्रेमी मंडळी आणि तरुणांची उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळून येथील युवकांसाठी अद्ययावत व्यायामशाळा आणि आधुनीक साहित्यासाठी दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याबद्दल त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन पंचायत समितीचे माजी उपसभापती डी. ओ. पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रमोद पाटील यांनी केले.

ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून आपण निंभोरा येथील ग्रामस्थांना सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली असून यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामे करण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, “या नवीन व्यायामशाळेच्या माध्यमातून गावातील तरूणांना आधुनिक पध्दतीने व्यायाम करता येणार आहे. तसेच खेळाडू बनण्याचे त्यांचा स्वप्न साकार होणार आहे. कोरोनाच्या आपत्तीत व्यायामानेच आपल्याला वाचविले आहे. आता सर्वांनी लसीकरणावर भर द्यावा.” विशेष करून १५ वर्षावरील मुलांसाठी लस आली असून यासाठी आपल्या घरात व परिसरात मुले असल्यास तातडीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केले.

Protected Content