यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील तालुका वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड नुकतीच संपन्न झाली आहे. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी ॲड. शामकांत जी. कवडीवाले (यावल) यांची निवड करण्यात आली. तसेच, सचिवपदी ॲड. शेखर सुजात तडवी (इचखेडा) आणि ग्रंथपालपदी ॲड. भूषण बी. महाजन (यावल) यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
१ जुलै रोजी यावल तालुका वकील संघाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. ज्यात नवीन कार्यकारिणीच्या निवडीचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. या बैठकीस माजी अध्यक्ष नितीन चौधरी, माजी सचिव आकाश चौधरी यांच्यासह ॲड. राजेश गडे, ॲड. एस. आर. लोंढे, ॲड. के. डी. पाटील, ॲड. गोविंदा बारी, ॲड. अजय कुलकर्णी, ॲड. खालिद शेख, ॲड. किशोर सोनवणे, ॲड. अशोक सुरळकर, ॲड. उमेश बडगुजर, ॲड. निवृत्ती पाटील, ॲड. एस. एस. कुलकर्णी, ॲड. विनोद परतणे, ॲड. मोहित शेख, ॲड. स्वाती साठे, ॲड. धीरज चौधरी, ॲड. दत्तात्रय सावकारे, ॲड. याकूब तडवी, ॲड. रितेश वारी, ॲड. गौरव पाटील, ॲड. रियाज पटेल, ॲड. देवकांत पाटील, ॲड. यशवंत दानी, ॲड. फैजल शेख, ॲड. स्मिता कवडीवाले, ॲड. मोनिका सावकारे, ॲड. हेमांगी चौधरी, ॲड. डिंपल सुरळकर, ॲड. श्याम इंगळे, ॲड. स्वाती पाटील, ॲड. दीपक वाणी, ॲड. योगी शेलार, ॲड. बदूद शेख, ॲड. अमीन अँडरोहित इंधाटे, ॲड. चित्रा भावसार असे वकील संघाचे अनेक सभासद उपस्थित होते.
उपस्थित सर्व सभासदांनी नवनियुक्त अध्यक्ष ॲड. शामकांत जी. कवडीवाले, सचिव ॲड. शेखर सुजात तडवी आणि ग्रंथपाल ॲड. भूषण बी. महाजन यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.