जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आकाशवाणी चौकात तीव्र घोषणाबाजी करून बॅनरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनआक्रोश मोर्चात बुधवारी २५ मे रेाजी महिला वर्गाचा अवमान करणारे वक्तव्य केले. त्याचा निषेधार्थ आकाशवाणी चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. खासदार सुळे यांची माफी मागा अन्यथा राष्ट्रवादी युवती काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी दिले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी आमदार मनिष जैन, राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष रविंद्रनाना पाटील, सुनिल माळी, युवक कार्याध्यक्ष सुशिल शिंदे, आशा आंभोरे, जयश्री पाटील, किरण राजपूत, नाईम खाटीक, राहूल टोके, किरण चव्हाण, संजय जाधव, अमोल कोल्हे, अरविंद मानकरी, मजहर पठाण, अशोक सोनवणे, जितेंद्र बागरे, रजा मिर्झा, विमल मोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.