यावल प्रतिनिधी । केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले याबाबत नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
यावल येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविन्द्र नाना पाटील ,तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारा पासुन काढण्यात आलेल्या या मोर्चात युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील , जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील , तालुका समन्ययक किशोर माळी , युवकचे कार्यध्यक्ष किशोर पाटील , युवक राष्ट्रवादीचे शहरा अध्यक्ष हितेश गजरे , राजेश करांडे , राहुल चौधरी, राकेश सोनार , तात्या कोळी ,यशवंत अडकमोल, अॅड अल्ताफ पटेल, अश्पाक पटेल , शुभम विचवे, कैलास अडकमोल , चंद्रकांत कोळी , मुस्तफा तडवी , समाधान पाटील , धनराज फालक ,दानिश पटेल , विजय भोई , भरत मोरे आदी पदाधिकारी यांनी या महागाई विरोधी आंदोलनात सहभाग घेतला यावेळी नायब तहसीदार राहुल सोनवणे , महसुलचे कोषागार मुक्तार तडवी यांना निवेदन देण्यात आले .