राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला शहराध्यक्ष सुरेखा पारधे यांचे निधन

यावल प्रतिनिधी  । येथील विरारनगर परिसरातील रहीवासी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यावल शहर अध्यक्ष सुरेखा सिताराम पारधे वय ३५ वर्ष यांचे आज अल्पशा आजाराने एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असतांना दुपारी ३ वाजेच्या सुमारास निधन झाले.

सुरेखा पारधे या महीलांच्या सामाजीक व विविध प्रश्नासाठी धावुन जाणाऱ्या कार्यकर्त्या म्हणुन त्यांची ओळख होती .एक महीला म्हणुन संघर्षमय जिवन जगणारी आमची उमदा कार्यकर्ता निघुन गेल्याचे आपल्या शोकसंदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी म्हटले व त्यांना श्रद्धांजली वाहीली . सुरेखा पारधे यांच्या पश्चात कुटुंबात आई, बहीण, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.