Home Cities चाळीसगाव दुपारी बस उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

दुपारी बस उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

0
25

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगावहून शिरसगाव तळोंदे येथे जाण्यासाठी बसची उपलब्धता करून देण्याची मागणी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव परिसरात शिरसगाव तळोंदे हे गांव प्रमुख गांव आहे. दररोज येथून शेकडो विद्यार्थी चाळीसगाव येथे शिक्षणाकरिता अप-डाऊन करीत असतात परंतु दुपारी २.३० ते ३.०० या वेळेत चाळीसगाव येथुन शिरसगांव तळोंदे येथे जाण्यासाठी बस नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होते.
तरी त्यांना दुपारी २.३० ते ३.०० या वेळेत बसची व्यवस्था करून देण्यात यावी. अन्यथा याप्रश्‍नी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर, राष्ट्रवादी युवकचे शहर-उपाध्यक्ष- शुभम पवार, प्रकाश पाटील, पवन महाजन, पिनू सोनवणे, पंजाबराव देशमुख, कौस्तुभ राजपूत, संकेत देशमुख, राहुल पाटील, निखिल चव्हाण, सचिन चव्हाण, हर्षल पाटील, निलेश मोरे, दीपक वाघ, अमोल पाटील, नितीन पाटील, सचिन पाटील, जयेश सोनवणे, हेमंत सोनवणे, वाल्मिक पाटील, रोशन मराठे, यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound