घरकूल योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करा- मनसेची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील पिळोदे बुद्रुक येथील घरकुलाच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आज मनसेने एका निवेदनाद्वारे केली आहे.

पिळोदे बुद्रुक ग्राम पंचायत अंतर्गत वितरीत करण्यात आलेल्या घरकुल योजनेत गोंधळ निर्माण झाला असल्याची तक्रार पंचायत समिती यावल येथे गटविकास अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात देण्यात आलेल्या लेखी तक्रार निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणणे आहे की, यावल तालुक्यातील पिळोदे बु. ग्रामपंचायत अंतर्गत शासनाच्या रमाई घरकुल योजने मध्ये ग्रामसेवकाने रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थी यादी मधील लाभार्थ्यांचे पक्के घर असतांना देखील नमुना आठ वर कच्चे व मातीचे घर असल्याचे प्रस्ताव जोडले असल्पाचे म्हटले आहे. या प्रकारा मुळे या रमाई घरकुल योजनेपासुन खरे लाभार्थी डावलले जात आहे अशी तक्रार केली असुन तात्काळ या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून शासनाची दिशाभुल करणार्‍या ग्रामसेवकावर खोटया लाभार्थ्यांची यादी पाठविल्याबद्दल फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व खर्‍या लाभार्थ्यांना न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल शहराध्यक्ष चेतन अढळकर, तालुका सचिव संजय नन्नवरे, संतोष जवरे यांनी प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना निवेदन दिले आहे.

Add Comment

Protected Content