खून करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला शिक्षा

भुसावळ प्रतिनिधी । चाकूने हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला आज येथील न्यायालयाने आज चार वर्षांची शिक्षा सुनावली.

अशरफ रशीद तडवी रा० बोरखेडा बु॥ ता यावल हा फिर्यादी सुबेदार नसीर तडवी या सोबत मोटरसायकलने न्हावी शिवारातील जाणेरी फाट्या जवळून जात असतांना त्याने चाकूने हल्ला केला होता. उसनवार घेतलेल्या ६०० रु मागीतले असता राग येऊन चाकुने सुबेदार याच्या मानेवर, छातीवर , पाठीवर व हातावर सपासप वार केले. या घटनेच्या वेळी फिर्यादी सोबत असलेला त्याचा मित्र रहेमान तडवी हा त्यास वाचविण्यासाठी आला असता आरोपी हा त्याचे अंगावर चाकु घेऊन मारणेसाठी धावला व त्यास शिवीगाळ केली होती, त्यामुळे तो सुद्धा घटनास्थळा वरुन पळून गेला होता. फिर्यादीला जखमी अवस्थेत न्हावी येथील डॉ प्रमोद पाटील कडे नेण्यात आले व जखमा गंभीर असल्याने त्यास सावदा येथील डॉ वारके यांचे सुश्रृत हॉस्पीटल मधे उपचारासाठी अ‍ॅडमिट करण्यात आले होते.

दरम्यान, फिर्यादी सुबेदार याच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध फैजपूर पोस्टे . ला गु र नं १४ / १५ हा भा.द स कलम ३०७, ५०४, ५०६ प्रमाणे दाखल झाला होता. सरकार तर्फ या खटल्याचे कामी एकुण तपासी अंमलदार पी.एस.आय. एम . जे . मोरे यांच्यासह दहा साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यापासुनच आरोपी हा जेलमधे होता. ह्या खटल्याचे कामकाज न्या . एस .पी. डोरले यांचे कोर्टात चालले. आरोपीस आज रोजी साक्ष पुराव्याअंती कलम उ०७ , ५०६ अन्वये दोषी धरण्यात येऊन कलम उ०७ साठी ३ वर्ष सक्त मजुरी तसेच २००० / – रु दंड व कलम ५०६ साठी १ वर्ष सक्त मजुरी तसेच १००० / – दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारतर्फे अतीरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. विजय खडसे यांनी काम पाहिले. तर फिर्यादी तर्फे खाजगी खाजगी वकील म्हणुन अ‍ॅड. मनिष कुमार वर्मा यांनी काम पहिले. त्यांना अ‍ॅड . विजयालक्ष्मी मुत्याल, अ‍ॅड . सचिन कोष्टी यांनी सहकार्य केले.

Add Comment

Protected Content