राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश गोसावी, मितेश पाटील आणि अक्षय पाटील यांच्यावर कारवाई करण्याची करा, अशी मागणीचे निवेदन मुक्ताईनगर तहसीलदार एन.पी.वाढे आणि पोलीस निरिक्षक राहुल खताळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.

निवेदनात नमुद केल्यानुसार, मुक्ताईनगर येथील शिवराज पाटील हे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सोशियल मीडिया सेलच्या जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. दि 2 ऑक्टोबर रोजी जामनेरचे भाजप आमदार गिरीष महाजन यांनी लाइव्ह ट्रेंड या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे म्हंटले होते की, मुक्ताईनगरचे आमचे आमदार चंद्रकांत पाटील, या वाक्याला अनुसरून शिवराज पाटील यांनी  २ ऑक्टोबर रोजी १.५० मिनिटाला त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून गिरीशभाऊ म्हणता मुक्ताईनगरचे आमदार आमचे म्हणजे भाजपाचे एकूण १०७ समजायचे का आता…. अश्या आशयाची पोस्ट अपलोड केली होती.

त्यावर दि. २/१०/२०२१ रोजी रात्री ८ वा. ८ मिनिटांनी प्रकाश गोसावी रा.मुक्ताईनगर, मितेश पाटील रा.शेमळदा, अक्षय पाटील रा.वरणगांव यांनी त्यांच्या मोबाईल वरून शिवराज पाटील यांना शिवराज पाटील यांच्या मोबाईल वर कॉल करून शिवसेना स्टाईल ने जिवंत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच चंदुभाऊ साठी रक्त देऊ शकतो तसे घेऊ शकतो. तसेच या पोस्टवर “बाळकडू देल्या शिवाय जमणार नाही”. अशी कॉमेंट करून लेखी स्वरुपात धमकी दिली आहे. तसेच तुम्ही अश्या स्वरूपाच्या पोस्ट करणे सुद्धा बंद करा, नाहीतर तुम्हाला कळेलच काय होईल ते. तसेच  ४०ते ५०+ अनोळखी लोक शिवराज पाटील यांना सतत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांचे नाव घेऊन जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. तरी शिवराज पाटील अथवा त्यांच्या  परिवारातील सदस्यांच्या जीवाचे काही एक बरे वाईट झाल्यास वरील व्यक्ती व त्यांचे  ४०-५० समर्थक लोक जबाबदार राहतील व त्यांनाच जबाबदार धरण्यात यावे.

तसेच वरील लोक  हे सतत शिवराज पाटील यांच्या  घराकडून मोटर सायकलींवर ट्रिपल सीट बसून येऊन जोर-जोरात होर्न वाजवून शिवराज पाटील यांना घाबरवत असतात. त्यामुळे शिवराज पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी प्रकाश गोसावी, मितेश पाटील, अक्षय पाटील यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून  शिवराज पाटील यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे

धमकी देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा निवेदनात इशारा देण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यु.डी. पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष शाहिद खान, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजु माळी, माजी सभापती विलास भाऊ धायडे, माफदा तालुका अध्यक्ष राम पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शिवा पाटील, युवक कार्याध्यक्ष राजेश ढोले, प्रविण दामोधरे, गजानन पाटील, वसंतराव पाटील, इकबार तडवी, भैय्या कांडेलकर, मयुर साठे, भुषण धनगर आणि भैय्या पाटील उपस्थित होते.

Protected Content