जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या पदाधिकार्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. या अनुषंगाने आज मातोश्रीवर अनेक मातब्बरांनी हाती शिवबंधन बांधले. यात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ पाटील, शेतकी संघाचे माजी सभापती प्रवीण पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मच्छिंद्र पाटील,पांडुरंग पाटील यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्व पदाधिकार्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, बाजार समिती सभापती कैलास चौधरी आदींची उपस्थिती होती.