यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील मधुकर सहकारी कारखान्याचे जेष्ठ संचालक कै . बारसु रामदास नेहते यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देवुन कुटुंबाचे सांत्वन केले.
काँग्रेसचे मसाकाचे जेष्ठनेते संचालक तथा तथा माजी गृहराज्यमंत्री स्व .जे .टी . महाजन यांचे निष्ठावंत निकटवर्ती कै. बारसु रामदास नेहेते यांचे दि. १० एप्रील रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ॲड. पाटील यांनी भेट दिली तेव्हा त्यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी सरपंच जलील सत्तार पटेल, कोरपावलीचे सामाजीक कार्यकर्ते मुक्तार पिरण पटेल, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष वसंत गजमल पाटील, हितेश गजरे, कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, पराग महाजन, हेमंत सर येवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी कै .बारसु नेहते यांचे चिरंजीव संदीप नेहते उपस्थित होते.