पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गोळीबार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांना पाच गोळ्या लागल्यामुळे केइएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोळ्या मारण्याच्या आधी त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घरगुती वादातून वनराज आंदेकर, बंडु आंदेकरचा जावई आणि वनराजचा दाजी गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचे समजते. गणेश कोमकर याने काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख याच्यांवर अ‍ॅसिड हल्ला केला. दरम्यान वनराज आंदेकरची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनराज यांच्यावर निकटवर्तीयाने गोळीबार केला असून कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे.

Protected Content