जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी जळगाव शहरात संपर्क अभियानास सुरूवात केली. आज सकाळी समाजिक कार्यकर्ते मुकुंद सपकाळे आणि दर्जी फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाल दर्जी यांची भेट घेवून चर्चा केली.
जळगाव शहर विधानसभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील उमेदवारी दाखल केल्यापासून शहरातील विविध भागात जावून नागरीकांशी हितगुज करत समस्या जाणून घेत आहे. जनतेने सेवेची संधी दिल्यास मतदाराच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याने अश्वासन देखील अभिषेक पाटील यांनी दिले आहे. आज दि.8 रोजी सकाळी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सपकाळे व दर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल दर्जी यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा केली. अभिषेक पाटील यांनी जळगावात संपर्क अभियान सुरू केले असून याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यासोबत समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिक सहभागी होत आहेत. एका बाजूला वैयक्तिक गाठीभेटी आणि दुसऱ्या बाजूला सामूहिक प्रचार अशा माध्यमातून ते जळगावकरांना परिवर्तनाची साद घालत आहेत.