Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज एक बाधित रूग्ण आढळला; ३ रूग्ण झाले बरे...

कोरोना : जिल्ह्यात आज एक बाधित रूग्ण आढळला; ३ रूग्ण झाले बरे !

0
39

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कोवीड अहवालात दिवसभरात १ रूग्ण आढळून आला आहे. तर ३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जळगाव जिल्ह्याच्या अहवालात आज चाळीसगाव तालुक्यातून एक रूग्ण आढळून आला आहे. तर तीन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत  १ लाख ४२ हजार ७३४ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १४९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. तर आतापर्यंत २ हजार २७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound